Nigdi : मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिराला प्रतिसाद

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष (Nigdi)तसेच माजी नगरसेवक सचिन चिखले यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांच्या संकल्पनेतून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता.

चिखले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या (Nigdi)विविध शिबिरांमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर, नेत्र तपासणी शिबिर तसेच रक्तदान शिबिर याचा समावेश होता. यावेळी विशेष तज्ज्ञांच्या  उपस्थितीत योग्य सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले.

या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या प्रक्रियेमध्ये तब्बल 650 नागरिकांनी सहभाग घेतला तसेच त्यांच्या तपासण्या यशस्वी रीतीने पार पाडण्यात आल्या.

Chinchwad : मोठी कारवाई! अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडला 96 किलो गांजा; एक कोटी 31 लाख 55 हजारांचा मुद्देमाल जप्त

तसेच मनविसेचे महाराष्ट्र राज्याचे सचिव आशिष साबळे-पाटील,उपाध्यक्ष हेमंत डांगे, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले (Nigdi)व मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष अनिकेत प्रभू यांच्या हस्ते मॉर्डन महाविद्यालय,यमुनानगर-निगडी येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन प्रतीक शिंदे, रोहित काळभोर, स्वप्निल महांगरे, विपुल काळभोर, सोमनाथ काळभोर, निलेश पवार, रुपेश पाटील, नगरसेवक सचिनभाऊ चिखले युवा मंच,गणाध्यक्ष मित्र मंडळ निगडी गावठाण यांनी केले होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.