Alandi: आळंदीमध्ये मुंबई मोर्चा आंदोलनाला चला या… निमित्ताने सर्व मराठा बांधवांना घरोघरी जाऊन मूळपत्रिका वाटण्यास सुरुवात

एमपीसी न्यूज -आळंदी देवाची येथे मराठा आरक्षण आंदोलन मोर्चा मुंबई जाणेसाठी (Alandi)तीळ गुळ घ्या गोड गोड बोला…आणि मुंबई मोर्चा आंदोलनाला चला या… निमित्ताने सर्व मराठा बांधवांना घरोघरी जाऊन मुळपञिका देण्यात येत आहे.
आणि या सदर कार्यक्रम एक हाती एक मराठा कोटी मराठा यांनी एकजुट (Alandi)होऊन मुंबई जाणेसाठी तयारी करत आहे.चलो मुंबई चर्चा  मराठा संघर्ष योध्दा मनोज  जरांगे पाटील यांनी पाठवलेला सांगावा मुंबई आंदोलन मोर्चा चलो मूंबई या आंदोलनात सर्व मराठा बांधवांना सहभागी होण्यासाठी आवश्यक लागणारी सामग्री यांच्या वर चर्चा करुन जे जाण्यासाठी इच्छुक असेल त्यांना जाण्या येण्याची व्यवस्था आळंदी संयोजक समितीच्या वतीने नियोजन करण्यात येणार आहे.

डि. डि.भोसले, प्रकाश कुऱ्हाडे ,रोहीदास तापकीर,आनंदराव मुंगसे , उत्तमराव भोसले ,जयसिंह कदम ,अरुण कुरे,शशीराजे जाधव , सागर महाराज लाहुडकर, भागवत शेजुळ , श्रीकांत काकडे, माऊली  गलबे , गणेश सोळंके उपस्थित होते.
 महाराष्ट्रातून विविध भागातून तयारी  सुरू झाली आहे .माऊलींच्या पदस्पर्शाने पावन भुमीतुन जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलन मुंबई दौरा याची तयारी सुरू आहे.याबाबत माहिती  मराठा संयोजक समिती आळंदी यांनी दिली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.