Nigdi : दत्त जयंतीच्या सप्ताहामध्ये ‘सायबर सुरक्षा’ विषयावर व्याख्यान

एमपीसी न्यूज – श्री स्वामी समर्थ केंद्र ,(दिंडोरी प्रणित )आकुर्डी व सायबर क्राईम पोलीस पुणे यांच्या सहकार्याने दत्त जयंती सप्ताहाच्या निमित्ताने 18 डिसेंबर रोजी ‘सायबर सुरक्षा’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) भगिनी निवेदिता बँकेच्या मागे गंगानगर आकुर्डी येथे 18 डिसेंबर 2018 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे.

सायबर सुरक्षेबाबत जनजागृती व्हावी हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असून यामध्ये सायबर गुन्हे म्हणजे काय ? सायबर गुन्ह्याचे प्रकार कोणते ? सायबर गुन्हे कसे होतात ? आणि त्याचे धोके काय आहेत ? सायबर गुन्हेगारी टाळण्यासाठी कोण कोणते उपाय महत्त्वाचे आहेत ? यावर या व्याख्यानांमधून प्रकाश टाकण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.