Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलीस शाळांमध्ये जाऊन मुलांना देताहेत ‘कायद्याचे ज्ञान अन संस्कार’

एमपीसी न्यूज – आजचे विद्यार्थी उद्याच्या जागरूक नागरिक असणार (Chinchwad)आहेत. जागरूक आणि जबाबदार नागरिकांची पिढी घडविण्यासाठी बाल वयातच चांगले संस्कार होणे आवश्यक असते. चांगल्या वाईटाची माहिती असल्यास मुले जपून वावरतात. यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी ‘एक दिवस शाळेसाठी’ हा उपक्रम सुरु केला आहे.

यासाठी 20 पथके तयार केली आहेत. ही पथके शाळांमध्ये जाऊन मुलांना वाहतुकीचे नियमन, सायबर गुन्हेगारी, सोशल मिडीयाचा वापर, ड्रग्ज आणि व्यसनाधीनतेपासून दूर राहणे, महिला व मुलींचा सन्मान करणे आदींबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

बालगुन्हेगारी ही शहराच्या भविष्याला(Chinchwad) लागलेली कीड आहे. शालेय जीवनात असतानाच काही मुलांना भुरट्या भाईगिरीचे आकर्षण वाटते. अनवधानाने ही मुले गुन्हेगारीकडे वळतात. त्यानंतर त्याचे गंभीर पडसाद त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर उमटतात. त्यामुळे मुलांवर योग्य वेळी संस्कार होणे आवश्यक आहे. यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.

एक दिवस शाळेसाठी या उपक्रमात पोलीस शाळांमध्ये जातील. तिथे मुलांना वाहतुकीचे नियमन, सायबर गुन्हेगारी, सोशल मिडीयाचा वापर, ड्रग्ज आणि व्यसनाधीनतेपासून दूर राहणे, महिला व मुलींचा सन्मान करणे अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करतील. त्यानंतर त्याच दिवशी त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवतील. या अहवालाची तपासणी उपायुक्त दर्जाचे अधिकारी करणार आहेत. या अहवालासोबत शाळेत गेलेल्या पथकाला मार्गदर्शन करतानाचे दोन फोटो देखील पाठवावे लागणार आहेत.

पोलिसांचे पथक प्रमुख आणि शाळा यांचा व्हाटसअप ग्रुप बनवला जाणार आहे. तिथे देखील विद्यार्थी आपल्या समस्या मांडू शकतील. तसेच मार्गदर्शन वर्ग झाल्यानंतर 15 मिनिटांचा वेळ राखीव असेल. या वेळेत विद्यार्थिनी त्यांच्या समस्या पोलिसांना खासगीत सांगू शकतील.

Wakad : आपल्यापर्यंत पोलीस पोहोचणार नाहीत या आत्मविश्वासाने केली चोरी; अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या;मुंबई, पालघरमध्ये तब्बल 24 घरफोड्या केल्यानंतर त्याने पिंपरी-चिंचवड शहर केले टार्गेट

शहरात 14 वाहतूक विभाग आहे. प्रत्येक वाहतूक विभागाचे एक पथक. वाहतूक मुख्यालयातील खटला, नियोजन विभाग आणि प्रशासन यांचे प्रत्येकी एक पथक, सहायक आयुक्त एक, सहायक आयुक्त दोन आणि पोलीस उपायुक्त यांचे प्रत्येकी एक पथक अशी 20 पथके यासाठी बनवण्यात आली आहेत. प्रत्येक मंगळवारी याबाबतचे नियोजन करून संबंधित पोलीस निरीक्षक प्रत्येक गुरुवारी शाळेत पोलीस वर्ग भरवतील.

गुरुवारी (दि. 7) झालेल्या पोलीस वर्गात 20 पथकांनी निवडलेल्या 20 शाळांमधील सुमारे सात हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या पोलीस वर्गाला विद्यार्थ्यांनी देखील चांगला प्रतिसाद दिला असल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी सांगितले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.