Nigdi : शटर उचकटून चोरटयांनी 19 लाखांचे दागिने चोरले

एमपीसी न्यूज – ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 50 किलो चांदी आणि 17 तोळे सोने असे एकूण 19 लाख 45 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. हा प्रकार आज (मंगळवारी) सकाळी आठच्या सुमारास निगडी येथे उघडकीस आला.

राकेश सुकनराज मंडेशा (जैन) (वय 38, रा. निगडी, गावठाण) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राकेश यांचे निगडी गावठाण येथे सुमंगलम ज्वेलर्स हे दुकान आहे. सोमवारी रात्री त्यांनी दुकान कुलूप लावून बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानातील सर्व दागिने चोरून नेले. यामध्ये 17 तोळे चांदी आणि 50 किलो चांदीचे दागिने होते. सकाळी राकेश दुकान उघडण्यासाठी आले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तात्काळ निगडी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. निगडी पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.