Nigdi : स्वराज्य संघाने पटकाविला आमदार चषक

एमपीसी न्यूज : विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे आणि बॉर्न क्रेझी स्पोर्टस् क्लब यांच्या वतीने आयोजित डे नाईट क्रिकेट स्पर्धेत आमदार चषक स्वराज्य संघाने पटकाविला.(Nigdi) या संघाला पहिल्या क्रमांकाचे 2 लाख 50 हजार रुपयांचे पारितोषिक,  ट्रॉफी दिली. द्वितीय 1 लाख 50 हजार रुपयांचे पारितोषिक प्रशांत भाऊ म्हाळस्कर या टीमने पटकावले.

1 ते 7 मे 2023 दरम्यान निगडीत डे-नाईट क्रिकेट स्पर्धा झाली. समारोपाला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे मॉडेल अर्शिया राशिद, रवरंभा चित्रपटाची अभेनेत्री मोनालिसा बागल, चित्रपटाचे डायरेक्टर अनुप जगदाळे यांनी देखील उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

तृतीय आणि चतुर्थ 1 लाख रुपये रक्कम व ट्रॉफीचे मानकरी यशवंत भाऊ पाचांगे व श्रीतेज 11 चऱ्होली हे ठरले. मॅन ऑफ द सिरीज मिळवण्याचा मान राहुल सातव या खेळाडूने मिळवला.(Nigdi) त्यांना यामाहा FZ बाईक भेट देण्यात आली. उत्कृष्ट गोलंदाज सलमान शेख यांना कुलर तर उत्कृष्ट फलंदाज दत्ता पवार यांना देखील कुलर देण्यात आले.

 

Maharashtra : बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवण्यात आलेले 21 हजार सिम कार्डस दूरसंचार विभागाने केले रद्द

याचप्रमाणे 40 टीममध्ये रहीम 11 या टीमने 33 हजार रुपयांचे पहिले बक्षीस मिळविले. शरद 11 या टीमने 22 हजारांचे द्वितीय क्रमाकांचे बक्षीस मिळवले. पुणे युनिव्हर्सिटी या टीमने तृतीय बक्षीस पटकाविले.  तरंग मोबाईल या टीमने चातुर्थ बक्षीस पटकाविले.  यात वैयक्तिक पारितोषिक देखील देण्यात आले. मॅन ऑफ सिरीज नंदू लोंढे, उत्कृष्ट गोलंदाज दत्ता पवळे, उत्कृष्ट फलंदाज गिरीष यांना बहुमान मिळाला. महिलांनी देखील उत्तम सामना रंगवला. गेम चेंजर या टीमने पहिला बक्षीस पटकावत ट्रॉफी मिळवली. ईगल्स या टीमने ट्रॉफी मिळविली.महिलांमध्ये वुमन ऑफ सिरीज मिळवण्याचा मान प्रांजल म्हस्के यांनी मिळवला. उत्कृष्ट फलंदाज दुर्गा शिंदे, उत्कृष्ट गोलंदाज माधुरी बनसोडे यांनी मिळवला.

यावेळी आमदार  उमा खापरे, शैलजा मोरे,ॲड. वर्षा डहाळे,अरुण थोरात, केशव घोळवे, राजेंद्र बाबर , समीर जावळकर, हंबीरराव आवटे, मिलिंद इनामदार, जयदीप खापरे, (Nigdi)  जागृती खापरे ,  सुशांत मोहिते, सतीश कुटे, सत्यन देशमुख, संतोष मुळीक, कुंदन चौधरी,कशिफ संगम ,मंगेश जोंधळे, प्रदीप साळवे तसेच बोंड क्रेझी स्पोर्ट्स क्लबचे सर्व सदस्य व खेळाडू उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.