Nigdi : बस प्रवासात पावणे दोन लाखांची चोरी

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएल बस प्रवासात एका महिलेच्या (Nigdi) पर्समधून सोन्याचा राणीहार, रोख रक्कम असा एक लाख 70 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना 9 ऑगस्ट रोजी दुपारी अडीच ते तीन वाजताच्या कालावधीत निगडी ते आकुर्डी दरम्यान घडली.

याप्रकरणी महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला बुधवारी दुपारी अडीच ते तीन वाजताच्या कालावधीत निगडी ते आकुर्डी दरम्यान पीएमपीएमएल बसने प्रवास करीत होत्या.

PMAY : पंतप्रधान आवास योजना अर्जासाठी मुदत वाढवा – काशिनाथ नखाते

या प्रवासात त्यांच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने चार तोळ्याचा (Nigdi) राणीहार, रोख रक्कम असा एकूण एक लाख 70 हजारांचा ऐवज चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.