PMAY : पंतप्रधान आवास योजना अर्जासाठी मुदत वाढवा – काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेच्या (PMAY) अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकासाठी आकुर्डी व पिंपरी येथे उभारण्यात आलेल्या 938 सदनिकांसाठी अर्ज भरण्याची मुदत उद्या संपत आहे. मात्र केवळ 8383 अर्ज आले असून अनेक अर्जदार बाकी आहेत. त्यांनाही या घरांची संधी उपलब्ध व्हावी यासाठी अर्ज करण्यास 10 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तहसील कार्यालयाकडून दाखले उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनेक कामगार, नागरिक अर्ज करण्याचे बाकी आहेत.

हा फॉर्म भरण्यासाठी डोमेसाईल सर्टिफिकेट व उत्पन्नाचा, जातीचा दाखला महत्त्वाचा आहे. तहसीलदार कार्यालयात अधिकचे अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांच्याकडून दाखले देण्यासाठी 20  ते 25 दिवस लागत आहेत.

Nigdi : यमुनानगर रुग्णालयात बाह्यरूग्ण विभागाचे लोकार्पण

यामुळे अनेक लोकांची इच्छा असतानाही अजून अर्ज करू शकले नाहीत. केवळ त्यांना आवश्यक प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यामुळे ते अर्ज करू शकलेले नाहीत. यापूर्वीच्या ज्या ज्या वेळी अशा प्रकारे अर्ज मागवण्यात आले. त्या वेळेला 40 ते 50 हजार अशा मोठ्या प्रमाणात अर्ज आपल्याकडे प्राप्त झाले होते.

मात्र आता केवळ 8383 अर्ज प्राप्त झाले आहेत. घरांची संधी जाऊ नये म्हणून हे अर्ज करण्यासाठी 10 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे नखाते यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.