NCP : अखेर नवाब मलिक यांना जामीन मंजूर; जाणून घ्या कारण

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (NCP ) आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दोन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.  राष्ट्रवादीने पक्षाने सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाचे स्वागत केले आहे.

पक्ष नवाब मलिक यांचे मनापासून स्वागत करतो. आम्ही  त्यांच्या परतीची आतुरतेने वाट पाहत आहोत. ते पक्षाचा मजबूत आणि बुलंद आवाज आहे आणि न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे हे जाणून बरे वाटले, अशी प्रतिक्रिया  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.

Nigdi : बस प्रवासात पावणे दोन लाखांची चोरी

नवाब मलिक आधी ईडी कोठडी आणि नंतर (NCP ) न्यायालयीन कोठडीत होते. तब्बल एका वर्षानंतर त्यांना दोन महिन्यांसाठी जामीन मिळाला आहे. प्रकृतीच्या कारणावरुन त्यांना जामीन मिळाला आहे.

नवाब मलिक यांना किडनीचा आजार आहे. या आजारावर उपचारासाठी जामीन मिळण्याची मागणी नवाब मलिक यांनी केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.