Chinchwad : घरफोडी करून 52 हजारांचा ऐवज लंपास; एकास अटक

एमपीसी न्यूज – घरफोडी करून एका (Chinchwad) तरुणाने 52 हजारांचा ऐवज चोरून नेला. पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 10) पहाटे चार वाजता उद्योगनगर, चिंचवड येथे उघडकीस आली.

अभिषेक म्हसू गायकवाड (वय 20, रा. दळवीनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी देवानंद वासुदेव चंद्रे (वय 33, रा. उद्योगनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

NCP : अखेर नवाब मलिक यांना जामीन मंजूर; जाणून घ्या कारण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि सुनील मोदी यांच्या घराची घरफोडी करून चोरट्याने मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 52 हजारांचा ऐवज चोरून नेला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.