Nigdi : कुत्र्याला फिरायला घेऊन आलेल्या व्यक्तीची सोनसाखळी दुचाकीस्वारांनी पळविली

एमपीसी न्यूज – कुत्र्याला फिरायला घेऊन आलेल्या एका व्यक्तीच्या गळ्यातील ६० हजारांची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 19) सायंकाळी प्राधिकरण, निगडी येथे घडली.

राहूल अशोक दीक्षित (वय 43, रा. कॅम्प एज्युकेशन शाळेजवळ, पेठ क्रमांक 27, प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दुचाकीवरील दोन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीक्षित गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास नियोजित महापौर बंगल्याजवळ कुत्र्याला फिरायला घेऊन आले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची 60 हजार रुपये किंमतीची सोनसाखळी हिसकावून नेली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.