Nigdi: श्री अग्रसेन ट्रस्टतर्फे विजय अग्रवाल यांचा सपत्नीक सत्कार

एमपीसी न्यूज – श्री अग्रसेन ट्रस्टतर्फे द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लबचे पुणे जिल्ह्याचे ‘रीजन दोन’चे चेअरपर्सन विजय अग्रवाल यांचा सपत्नीक नुकताच सत्कार करण्यात आला. तसेच लायन्स क्लबचे तळवडे विभागाचे अध्यक्ष अशोक अग्रवाल यांनी संत गवर शेठवाणी प्रतिष्ठानला एक लाख रुपयांची मदत केली आहे.

निगडीत झालेल्या कार्यक्रमाला चिंचवड-प्राधिकरण अग्रसेन ट्रस्टचे अध्यक्ष भीमसेन अग्रवाल, सांस्कृतिक कमिटीचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, लायन्स क्लबचे तळवडे विभागाचे अध्यक्ष अशोक अग्रवाल, राजेश अग्रवाल आदी उपस्थित होते.

विजय अग्रवाल यांची द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लबचे ‘पुणे जिल्ह्याचे रीजन दोन’च्या चेयरपर्सनपदी नेमणूक झाली आहे. त्यामुळे अग्रवाल आणि त्यांच्या पत्नी संगीता अग्रवाल यांचा सत्कार करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.