Noida Police News : सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी नोयडा पोलिसांचा मायक्रोसॉफ्टशी करार

एमपीसी न्यूज: नोयडा शहरात वाढत चाललेल्या सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी नोयडा पोलीसांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीशी करार केला आहे. सोमवारी (दि. 18) हा करार करण्यात आला. या करारानंतर पोलीस सायबर गुन्हे करणा-या गुन्हेगारांवर प्रभावीपणे कारवाई करू शकणार आहेत.

पोलीस कमिशनर आलोक सिंग आणि मायक्रोसॉफ्टच्या संबंधित अधिकाऱ्याने या करारावर सह्या केल्या आहेत. यामुळे सायबर गुन्हे रोखण्यास मदत होणार आहे.

या करारा अंतर्गत मायक्रोसॉफ्ट कंपनी नोयडा पोलिसांना तांत्रिक बाबींमध्ये मदत करणार असून तशा सेवादेखील पुरवणार आहे.

तसेच  मायक्रोसॉफ्ट पोलिसांसाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ या केंद्राचीही स्थापना करणार आहे. पोलिसांच्या ध्येय प्राप्तीसाठी ही कंपनी एक रोडमॅपदेखील बनवणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.