Pune News : पीपीपी तत्त्वावर बस खरेदी का नाही ? : नगरसेवक विशाल तांबे

एमपीसी न्यूज : पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजेच पी.पी.पी.पद्धतीने रस्ते बांधायला परवानगी देता मग त्याच पद्धतीने पीएमपीसाठी बस खरेदी का नाही, असा सवाल स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना लेखी पत्राद्वारे केला आहे.

महापालिकेत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला शहराचा समतोल विकास न करता केवळ एका मतदारसंघातच 500 कोटी रुपयाचे रस्ते व पूल बांधणीसाठी खर्च करत आहे. हा दुजाभाव का ?, असा सवालही त्यांनी सत्ताधार्‍यांना विचारला आहे. पी.पी.पी.पद्धतीने रस्ते विकसित करण्याचे मान्य करता, मग त्याच पद्धतीने पीएमपीसाठी बस खरेदी का केली जात नाही,असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

जानेवारी महिन्याच्या मुख्य सभेच्या कार्यपत्रिकेवर विषय क्रमांक 209 मध्ये बस खरेदीची तरतुद वर्गीकरण करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. पीएमपीसाठी इलेक्ट्रॉनिक बस जीसीसी मॉडेल विकत किंवा पी.पी.पी या पद्धतीने विकत घेण्यासाठी चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात तरतुद केली गेली आहे.

या तरतुदीपैकी 9 कोटी रुपये पदपथावरील दिवे वीज खर्चासाठी वर्गीकरणाने उपलब्ध करून द्यावे, असे या प्रस्तावात नमूद केले आहे. या प्रस्तावाचा संदर्भ घेत तांबे यांनी सत्ताधारी भाजप आणि प्रशासनावर टिका केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.