Pune Police : असद अहमद चकमकीपूर्वी पुणे आणि नाशिकमध्ये होता राहत; पुणे पोलिसांचा तपास सुरू

एमपीसी न्यूज : उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड अतिक अहमद याचा (Pune Police) मुलगा असद अहमद आणि त्याचा साथीदार गुलाम हे उत्तर प्रदेश पोलिसांशी झांशीमध्ये झालेल्या चकमकीत ठार झाले. काही महिन्यांपूर्वी असद हा पुणे आणि नाशिक येथे राहत असल्याचे निष्पन्न झाले होते.  गुंड अबू सालेमच्या साथीदारांनी असद आणि त्याच्या साथीदाराला मदत केल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी तपास सुरू केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, असद आणि गुलाम हे उत्तर प्रदेशचे आमदार राजू पाल यांचा मुख्य साक्षीदार उमेश पाल यांच्या हत्येप्रकरणी वाँटेड होते. 2005 मध्ये झालेल्या हत्येनंतर उमेश पाल उत्तर प्रदेश पोलिसांकडे साक्ष देत होता. यावर्षी 24 फेब्रुवारी रोजी प्रयागराज येथील त्यांच्या घराजवळ त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

तेव्हापासून असद आणि गुलाम फरार होते. अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद हे असदला पोलिसांपासून दूर जाण्यास मदत करण्याचा प्रयत्न करत होते. तपासादरम्यान अशरफने अबू सालेम टोळीतील काही सदस्यांच्या मदतीने असद आणि गुलाम यांना पुणे आणि नाशिक येथे राहण्यास मदत केल्याचे निष्पन्न झाले.

Maharashtra News : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत; जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

असद आणि गुलाम हे पोलिसांपासून वाचण्यासाठी कानपूर, नोएडा आणि दिल्ली येथे थांबले (Pune Police) होते, परंतु उत्तर प्रदेश पोलिसांचे एक पथक त्यांच्या मागावर होते. सालेम टोळीतील काही सदस्यांच्या मदतीने अतिक अहमदने असद आणि गुलाम यांची नाशिक आणि पुण्यात राहण्याची व्यवस्था केल्याचे उघड झाले आहे. अतिक आणि अबू सालेम हे मित्र असल्याची माहिती आहे.

पुणे पोलिस आता या प्रकरणाचा तपास करत असून, गुन्हे शाखेने उत्तर प्रदेश पोलिसांकडून माहिती मागवणार असल्याचे सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.