Rathani News: विद्यार्थ्यांसमोर हाणामारी करणा-या शिक्षकांसह मुख्याध्यापिकेला नोटीस

एमपीसी न्यूज – विद्यार्थ्यांसमोर हाणामारी करून बेशिस्त वर्तणूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रहाटणी येथील शाळेतील दोन उपशिक्षकांना शिक्षण विभागाने कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. तसेच शिक्षण विभागापासून हा प्रकार लपविल्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापिकेलाही नोटीस देण्यात आली.

शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी नोटीसा दिल्या आहेत. मुख्याध्यपिका अलका ताटे, उपशिक्षक अण्णा वाघोले, गणेश लिंगडे यांना नोटीस दिली आहे. महापालिकेची रहाटणी येथे शाळा आहे. या शाळेत उपशिक्षक लिंगडे आणि वाघोले कार्यरत आहेत. या दोघांमध्ये कर्मचारी महासंघ आणि शिक्षक संघटनेच्या मुद्यावरून वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही उपशिक्षकांची चालू वर्गातच हाणामारी झाली. या हाणामारीची महापालिकेच्या शिक्षण विभागाला मुख्याध्यापिकेने देणे अपेक्षित होते. या हाणामारीची माध्यमातून वाच्यता झाल्यानंतर शिक्षण विभागाला माहिती मिळाली.

Theft In Doctor’s House: नोकरानेच केली डॉक्टरच्या घरात चोरी

महापालिकेच्या शिक्षण विभागाची आणि शाळेची बदनामी झाली आहे. त्यामुळेच मुख्याध्यापिका ताटे यांच्यासह उपशिक्षक वाघोले, लिंगडे यांना बेशिस्त वर्तन केल्याबद्दल आणि तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये? अशा आशयाची नोटीस देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.