Accident News : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार व्यक्तीचा मृत्यू झाला असून दुचाकी वरील सहप्रवासी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. 5) रात्री चाकण येथे घडली.

नंदकुमार विष्णू पडवळ (वय 42, रा. चाकण) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराने नाव आहे. सहप्रवासी दत्तात्रय जानकू शेवकरी हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी नंदकुमार यांचे भाऊ बारकू विष्णू पडवळ (वय 36) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ट्रक चालक नाझीबुल रहमअली इस्लाम (वय 24, रा. आसाम) याला अटक केली आहे.

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, MPSC करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे भाऊ नंदकुमार आणि त्यांचा मित्र दत्तात्रय हे दोघेजण दुचाकीवरून आंबेठाण चौकातून आंबेठाण गावाकडे जात होते. ते सुरेश गोरे यांच्या शिवसेना कार्यालयासमोर आले असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात नंदकुमार यांचा मृत्यू झाला. तर दत्तात्रय यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.