Vadgaon Maval : आता मावळ वासियांची होते औषध खर्चात ९० % पर्यंत बचत

प्रधानमंत्री जन औषधी योजनेचा तृतीय वर्धापन दिन उत्साहात 

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथे प्रधानमंत्री जन औषधी योजनेच्या तृतीय वर्धापन दिनाचा कार्यक्रम शनिवारी (दि ७) मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे, पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर, नगरसेविका प्रमिला बाफना, राजेश बाफना, सुशील भिडे, नारायणगाव येथील डॉक्टर मनोहर डोळे फाउंडेशनचे डॉ सतीश धोंगडे, तसेच डाॅ संजय दशपुत्रे (एस्ट्रो होमिओपॅथी तज्ज्ञ मुंबई), डॉ.अलका कांबळे (निसर्गोपचार तज्ञ नवी मुंबई) , डॉ. माया पगारे (डायबिटीस तज्ञ.पुणे), लायन प्रदीप बाफना, लायन अमोल मुथा, सुरेंद्र सुवालाल बाफना व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी शुभेच्छा देताना नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी वडगावकर नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यन्त गरजेचे अशी अत्यल्प पैशामध्ये प्रमाणित व उच्च दर्जाची जेनेरिक औषधे उपलब्ध करून आदर्श अशी समाजसेवा करत असल्याचे सांगितले.

माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर यांनी रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा हे व्रत जोपासत सर्व सामान्य मावळ वासीयांना आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी अतिशय अल्प दरात जागतिक आरोग्य संघटनेचे मान्यता प्राप्त अशी सरकारी जेनेरिक औषधे उपलब्ध करून देत मावळ वासियांचे जीवनमान उंचावण्याचे आदर्श काम करीत असल्याचे सांगितले व मावळ वासियांच्या वतीने संदीप बाफणाचे अभिनंदन केले.

सुशीलकुमार भिडे यांनी ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याची गरज असल्याचे सांगितले. जेनेरिक औषधे ही WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने प्रमाणित केलेल्या NAB मध्ये प्रत्येक औषधाच्या बॅचची तपासणी होते. देशात ७०० जिल्ह्यात ६००० पेक्षाही अधिक जन औषधी केंद्र आहेत. यावर्षी जनतेचे जवळ जवळ २२०० कोटी रुपये जनऔषधी केंद्रामुळे वाचले आहेत.

या कार्यक्रमात विनामूल्य ७० जणांची नेत्र तपासणी झाली व पाच रुग्णांना मोफत मोती बिंदू शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर मनोहर डोळे फाउंडेशन नारायणगाव येथे नेण्यात आले. एस्ट्रो होमिओपॅथी, डायबिटीस, निसर्गोपचारचे ४० रुग्णाचे मोफत तपासणी व औषोधोपचार करण्यात आले. तसेच हेल्थ ई टी एम (रोगनिदानविषयक तपासणी व ऑन लाईन डॉक्टर सल्ला सेन्टर ) चे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. तरी सर्वांनी HEALTH ATM या नवीन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे आभार अनिता संदीप बाफना व कांचन अशोक बाफना यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.