Chinchwad News: ‘अधिकारी, कर्मचा-यांनी ‘जीईएम’ पोर्टलचा वापर करावा’

एमपीसी न्यूज – गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (जीईएम) पोर्टल चा वापर अधिकारी आणि कर्मचा-यांनी अधिक कार्यक्षमतेने करावा, यासाठी महापालिकेच्या वतीने एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन चिंचवड येथील ऑटोक्लस्टर येथे करण्यात आले होते.

उद्योग संचालनालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार महापालिकेच्या वतीने महापालिकेमध्ये  खरेदी विषयक कामकाज करणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांना गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस पोर्टल बाबत प्रशिक्षण देण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उप आयुक्त मनोज लोणकर, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांच्यासह विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.  यावेळी जीईएम पोर्टल नोडल अधिकारी  निखील पाटील, अमोल नळे यांनी उपस्थितांना गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस पोर्टल बद्दल मार्गदर्शन केले.

Pune Corona : पुणेकरांनो काळजी घ्या! कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा पुण्यात शिरकाव, 13 रुग्णांची नोंद

पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये वस्तू व सेवा खरेदी करण्यासाठी जीईएम  पोर्टलचा वापर करण्यात येतो. या पोर्टलचा वापर अधिक कार्यक्षमतेने आणि प्रभावीपणे होण्यासाठी जेईएम पोर्टल मध्ये झालेल्या बदलाबाबत उद्योग संचालनालयाद्वारे महापालिकेला  कळविण्यात आले होते. त्याबदलाची अद्यावत माहिती अधिकारी आणि कर्मचारी यांना होण्यासाठी महापालिकेच्या कामगार कल्याण विभागामार्फत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.