OLX Fraud : ओएलएक्सवर खरेदी व विक्री करणाऱ्या दोन जणांची फसवणूक

एमपीसी न्यूज : ओएलएक्सवर (OLX Fraud) खरेदी व विक्री करणाऱ्या दोन जणांची फसवणूक केल्याची घटना वानवडी आणि चिंचवड येथे घडली. दोघांनीही आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे.

पहिल्या प्रकरणात विक्रम रानडे (वय 28 वर्षे, रा. वानवडी, पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी यांनी 2 जुलै रोजी पिंपरीमध्ये महिंद्रा ऍनथीया या सोसायटीमध्ये ओएलएक्सवर त्यांचा सोफा सेट विकण्यासाठी जाहिरात दिली होती.

Bhosari Cheating Case: अज्ञात व्यक्तीकडून भोसरी येथील कंपनीची 97.17 लाख रुपयांची फसवणूक

त्यांना एका मोबाईल नंबरवरून (OLX Fraud) फोन येऊन क्युआर कोड पाठवून त्याद्वारे समोरील इसमाने थोडे थोडे करून 47,997 रुपये पेटीएमद्वारे घेऊन त्यांची फसवणूक केली. आरोपी विरोधात भा. द. वि. कलम 420 व माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत त्या मोबाईल नंबर धारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या फसवणूकीच्या प्रकरणात हर्षल शिंपी (वय 27 वर्षे, रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. प्रमोद कुमार या आरोपी विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात भा. द. वि. कलम 420 व माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी प्रमोद कुमारने ओएलएक्सवर एसी, टी व्हि, फ्रिज, वॉशिंग मशीन, बेड, वॉल रूफ, डायनिंग टेबल इत्यादी घरगुती वापराच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असल्याबाबत जाहिरात दिली होती. ती पाहून फिर्यादी यांनी आरोपीला फोन केला असता वस्तू विक्री करण्याच्या बहाण्याने त्यांची 27,000 रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.