Nigdi : पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

गावठी पिस्तुलासह दोन जिवंत काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज – बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण 45 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

आकाश ऊर्फ पिंटू उर्फ बुटासिंग प्रकाश साळवे (वय. 23 रा. यशवंतनगर कॉलनी, तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशन जवळ, तळेगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार किशोर बबन पढेर यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकुर्डी येथील आंध्रा बॅंकेच्या समोरील रोडवर एक तरुण संशयास्पद उभा असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार निगडी पोलिसांनी सापळा रचून आकाश याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळली. पोलिसांनी आकाश विरोधात भारतीय हत्यार कायदा आणि मुंबई पोलीस अधिनियमान्वये गुन्हा दाखल करून 45 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त केला. निगडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.