Dapodi Crime News : प्रसिद्ध कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून 40 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – प्रसिद्ध कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून, त्यांचे खोटे जॉईनिंग लेटर देत 40 हजारांची फसवणूक केली. सी.एम.गेट, दापोडी येथे 17-12-2021 ते 28-03-2022 या कालावधीत ही घटना घडली.

याबाबत विजय काशीनाथ तांबे (वय 38, रा. वाघोली, पुणे) यांनी भोसरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून फारूख अहमद अली लासकर (वय 40, रा. चिखली) याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना प्रसिद्ध कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी 39 हजार 500 रुपये घेऊन, व्हॉटस्अपवरती खोटे जॉईनिंग लेटर पाठवून फसवणूक केली. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.