Pimpri Corona Update: शहरात आज 11 नवीन रुग्णांची नोंद, 4 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 11 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 4 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

सलग अकराव्यादिवशी कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. ही दिलासादायक बाब आहे. आजपर्यंत शहरातील 4 हजार 624 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 59 हजार 196 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली.

सध्या 77 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 75 रुग्ण गृहविलगीकरणात असून 2 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 7 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 294 आहेत. आज दिवसभरात 3 हजार 247 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 35 लाख 2 हजार 161 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.