Pimpri : विनापरवाना गोमांस विकणाऱ्या एकाला अटक

एमपीसी न्यूज – गोमांस विकण्याची परवानगी नसताना एकाने गोमांसाची विक्री केली. याबाबत त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. ही कारवाई पिंपरी पोलिसांनी मंगळवारी (दि. 5) बौद्धनगर येथे केली.

जाकीर अब्दुल मकमुल कुरेशी (वय 30, रा. बौद्धनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या विक्रेत्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई प्रशांत जाधव यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. तसेच जमावबंदी आणि संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांव्यतिरिक्त अन्य दुकाने सुरू ठेवण्यासाठी प्रशासनाने परवानगी दिलेली नाही.

असे असताना आरोपी कुरेशी याने त्याच्याकडे गोमांसाची विक्री करण्याचा परवाना नसताना गोमांसाची विक्री केली. याबाबत त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.