BNR-HDR-TOP-Mobile

Pune : कांद्याने आणले सर्वसामान्य पुणेकरांच्या डोळ्यांत पाणी

किरकोळ बाजारपेठेत 150 ते 160 रुपये किलो

एमपीसी न्यूज – यंदा अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचा फटका सर्वसामान्य पुणेकरांना बसला आहे. रोजच्या ताटात असलेला कांदा किरकोळ बाजारपेठेत तब्बल 150 ते 160 रुपये किलो दराने विकला जात आहे. त्यावर कुणाचेही अंकुश पाहायला मिळत नाही.

नवीन कांदा येण्यास आणखी 2 ते 3 महिने वेळ जाणार आहे. त्यामुळे सध्यातरी कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता फार कमी असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सफरचंद 100 रुपये किलो तर, कांदा 160 रुपये किलो दराने विकला जात आहे. यावर्षी हा कांद्याला उच्चांकी दर असल्याची चर्चा आहे. वाढत्या महागाईमुळे जगणे मुश्कील झाले आहे. भाजीपाला, नेट पॅक, पेट्रोल, अशा सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढतेच आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसांनी जगावे तरी कसे? असा सवाल गृहिणी नेहा दांगट आणि सुनीता बराटे यांनी उपस्थित केला.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3