Sangvi : तरुणाची 43 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक

एमपीसी न्यूज – झूम कार हे संकेतस्थळ पाहताना एका अज्ञात आरोपीने तरूणाच्या मोबाईलवर फोन केला. मोबाईलवर एक लिंक पाठवून त्याव्दारे बँक खात्यातून 43 हजार रूपये स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर करून फसवणूक केली. ही घटना पिंपळेगुरव येथे नुकतीच घडली.

संदीप परशुराम गायकवाड (वय 35, रा. पिंपळे-गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी संदीप यांना भाड्याने मोटार घ्यायची होती. त्यासाठी ते zoom car.com या संकेतस्थळावर मोटार भाड्याने आहे का,  हे पाहत होते. त्याचवेळी संदीप यांना एका अज्ञात व्यक्तीने मोबाईलवर फोन केला. मोबाईलवर आलेली लिंक ओपन करण्यास सांगितली. त्यानंतर संदीप यांच्या एसबीआय बँकेच्या खात्यातून  43 हजार रूपये काढून घेत फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.