Pimpri News : नेत्रतज्ज्ञ डॉ. सुहास वाघमारे यांचे निधन

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ व वाकडगावचे सुपुत्र डॉ. सुहास विष्णुपंत वाघमारे (वय 56) यांचे गुरुवारी (दि.3) निधन झाले. कोविड पश्‍चात उपचारादरम्यान पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.

त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी,भाऊ व वहिनी असा परिवार आहे.

पिंपरीतील विजयश्री डे केअर आय क्‍लिनिकच्या माध्यमातून ते नेत्रचिकीत्सा व्यवसायात कार्यरत होते. विविध संस्था, संघटनांच्या सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असायचा.

आतापर्यंत त्यांनी अनेक गोर-गरीब व गरजु नागरिकांवर मोफत नेत्रशस्त्रक्रिया करत सामाजिक बांधिलकी जपली होती. त्यांच्या पार्थिवावर वाकड स्मशानभुमीत अंत्यसंस्कार
करण्यात आले.

पुणे महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांचे ते चुलत बंधु होत. तर, आळंदीतील वैद्यकीय व्यावसायिक डॉ. नीलेश रंधवे यांचे ते मामा होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.