Diabetes Day : जागतिक मधुमेह दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन

एमपीसी न्यूज – मधुमेह या आजाराबद्दल जनजागृती (Diabetes Day) करण्यासाठी 14 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिवस म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो.  मधुमेहा आजाराबाबात जनजागृती व्हावी यासाठी जनजागृती रॅलीचे आयोजन 18 नोव्होंबर रोजी आयोजित केली असून विविध उपक्रम राबविणत येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत  डॉ.  चंद्रहास शेट्टी, मुख्य संयोजक (लायन्स प्रांतपाल 2016-17) आणि महाराष्ट्र अवयव दान प्रमुख ) यांनी दिली.

या वेळी सहसंयोजक लायन- शाम खंडेलवाल, सहसंयोजक लायन- सतीश राजहंस, संघटक सचिव लायन- बलविंदरसिंग राणा, संघटक सचिव लायन- विठ्ठल कुटे, शरद पवार, विकास मुळे उपस्थित होते. पुढे माहिती देताना शेट्टी म्हणाले, आजचे जागरूकता शिक्षण उद्याचे मधूमेहपासून संरक्षण या घोष वाक्यानुसार  मधूमेह संर्दभात जनजागृतीसाठी लायन्स डायबेटिस अवेअरनेस नावाने आम्ही 2004 पासून विविध कार्यक्रम आयोजित करित आहोत.

जनजागृतीचे यंदाचे वर्ष 19 असून 19 वा (Diabetes Day) लायन्स वर्ल्ड डायबेटीस जागरूकता आणि अवयव दान कार्यक्रम 18 नोव्हेंबर रोजी सकाळपासून आयोजित करण्यात आला आहे. ह्या उपक्रमात सकाळी 8 वाजता सिटीप्राईड थिएटर ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड या दरम्यान जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत विद्यार्थी, खेळाडू, मधूमेह रुग्ण, डॉक्टर्स, विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिक आणि लायन्स आदी सहभागी होणार आहेत.

लायन्स क्लब्स मित्र परिवार, लायन्स क्लब्स ऑफ पुणे 21 सेंचुरी, पॅटरॉन क्लब, पार्टिसिपटिंग क्लब, एन.एम. वाडिया हॉस्पिटल,  स्काय क्लिनिक,  सेठ ताराचंद रामनाथ चॅरिटेबल हॉस्पिटल, पतित पावन संघटना, पुणे शहर यांच्या पुढाकाराने हे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Women harassment : विवाहितेच्या छळ प्रकरणी पती सह सहा जणांवर गुन्हा दाखल

सदर उपक्रमांतर्गत 18 नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मधुमेह आणि वैद्यकीय तपासणी शिबीर आणि सकाळी 10 ते 12.30 वेळेत मधुमेह आणि अवयवदान या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित केले आहे. इन्सुलिनबाबत समज-गैरसमज,  मधुमेहाबाबत घ्यावयाची दक्षता, लहान मुलांमधील मधुमेहाची लक्षणे आणि दक्षता, मधुमेहींसाठी आहार, अवयवदानासाठी जनजागृती  तणावमुक्त जीवन कसे जगावे या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे.

त्याचप्रमाणे दरवर्षी प्रमाणे 20-30 स्टॉल्सचे प्रदर्शन ज्यामध्ये मधुमेह, रक्तातील साखरेची तपासणी, डोळ्यांची तपासणी, प्रतिबंध किंवा व्यवस्थापित करण्यासाठी नवीनतम नवकल्पनांचे प्रदर्शन असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.