Chikhali burglary : चिखलीतील कृष्णानगर पोलीस लाईन मध्ये भरदिवसा घरफोडी

एमपीसी न्यूज – कृष्णानगर पोलीस लाईन येथे घरफोडी झाली असून त्यात चोरट्यांनी तीन लाख 69 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.(Chikhali burglary) ही घटना सोमवारी (दि. 14 ) दुपारी दीड ते दोन या कालावधीत घडली.

याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Women harassment : विवाहितेच्या छळ प्रकरणी पती सह सहा जणांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर सोमवारी दुपारी कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्याने घराचा लाकडी दरवाजा आणि लोखंडी सेफ्टी दरवाजाचा कडी कोयंडा अज्ञात चोरट्याने तोडून घरात प्रवेश केला. घरातून 92 ग्रॅम वजनाचे तीन लाख 64  हजार रुपयांचे सोन्याचे दागिने (Chikhali burglary) आणि पाच हजार रुपये रोख रक्कम असा एकूण तीन लाख 69 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार दुपारी दीड ते दोन वाजताच्या कालावधीत घडला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.