Pune : शांतता….पुणेकर वाचत आहेत ; वाचन संस्कृती संवर्धनासाठी उद्या दुपारी 12 ते 1 वेळेत पुस्तकाचे वाचन करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या ( नॅशनल बुक ट्रस्ट) वतीने (Pune )फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १६ ते २४ डिसेंबर दरम्यान पुणे पुस्तक महोत्सवाच्या होत आहे.

या महोत्सवाच्या निमित्ताने उद्या १४ डिसेंबरला दुपारी १२ ते १ दरम्यान शांतता…पुणेकर वाचत आहे होणार असून, त्याला शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, सामाजिक संस्था, सरकारी आणि खासगी कार्यालये, महापालिकेचे क्षेत्रिय कार्यालये, खासगी आस्थापना अशा सर्वांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आज दुपारी 12 वाजता पुणेकर वाचन करणार असून, यात आपणही सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Pimpri : इंद्रायणी, पवना नदी परिसर प्रदूषणमुक्त करणार- मंत्री उदय सामंत

पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन पुणे महापालिका, (Pune)उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षण यांनी एकत्र येत आयोजन केले आहे.पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने शांतता…पुणेकर वाचत आहे या उपक्रमाला पुणेकरांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

या उपक्रमाला पुणे बार असोसिएशन, पुणे श्रमिक पत्रकार संघ, महाराष्ट्र साहित्य परिषद, खडकी शिक्षण संस्था, रिक्षा पंचायत, भारतीय विचार साधना, ग्राहक पेठ, लायन्स क्लब, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, मॉडर्न लॉ कॉलेज, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, विमलाबाई गरवारे प्रश्नाला, एच. व्ही.देसाई महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, एटीएसएस कॉलेज ऑफ बिझिनेस स्टडीज अँड कंप्युटर एप्लिकेशन, सह्याद्री शिक्षण मंडळ आर्ट्स , सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, मामासाहेब मोहोळ कॉलेज, विविध ग्रंथालये, सरकारी अधिकारी, कर्मचारी, राजकीय नेते, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, शाळा – महाविद्यालयातील विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आदी सहभागी होणार आहे. या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी आतापर्यंत सुमारे 250 सामाजिक संस्थांनी पाठिंबा दिला आहे.

उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, शिक्षणतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध देशपांडे, सिम्बायोसिस कुलपती डॉ.एस. बी मुजुमदार, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे अध्यक्ष प्रदीप रावत, बार्टीचे महासंचालक डॉ. सुनील वारे, सरहदचे संजय नहार, डॉ. गजानन एकबोटे, डॉ. पी. डी. पाटील, डॉ. शिवाजीराव कदम, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष केतन कोठावळे, पत्रकार अरुण खोरे, साहित्यिक शरणकुमार लिंबाळे, चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अभिनेता प्रवीण तरडे आदी या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

शांतता ..पुणेकर वाचत आहे हा उपक्रम पुणेकरांचा उपक्रम आहे. त्यामुळे त्यात पुणेकरांचे योगदान महत्त्वाचे आहे. सर्व पुणेकरांनी आज दुपारी १२ ते १ या वेळेत जिथे असाल तिथे वाचन करायचे आहे. या उपक्रमात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने होत आहे. मुख्याध्यापक आणि प्राचार्यांनी आपल्या ग्रंथालयात विद्यार्थ्यांना वाचन करण्यासाठी प्रेरित करून, वाचन संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी केले आहे.

वाचनाने आपण समृद्ध होतो आणि अधिक चांगले व्यक्ती बनतो. आज दुपारी दुपारी १२ ते १ या वेळात आपल्या आवडीचे कोणतेही एक पुस्तक वाचून या वाचन उपक्रमात आपण सहभागी होऊ शकता. या प्रतिनिधिक सहभागानंतरही वाचनाची आवड आपण कायम जोपासाल या खात्रीसह खूप शुभेच्छा.
– सूरज मांढरे, शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवात मी सहभागी होणार असून, आपणही सहभागी व्हायचे आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज गुरुवारी दुपारी १२ वाजता मी पुस्तक वाचन करणार आहे. आपणही मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होऊन, आवडीचे पुस्तक वाचायचे आहे
– डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ

पुणे पुस्तक महोत्सवाच्या आयोजनात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा महत्त्वाचा सहभाग आहे. पुणेकर म्हणून आपणही सहभागी होऊन आज दुपारी बारा वाजता आवडीचे पुस्तक वाचावे. वाचन संस्कृतीचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने होणाऱ्या या महोत्सवाच्या निमित्ताने वाचकांचे गुगल फॉर्मद्वारे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यातून पुणेकर काय वाचतात, वयोगट कोणता, आवडता विषय, आवडतो, आवडते लेखक किंवा साहित्यिक कोणते अशी माहिती समोर येणार आहे. त्याचा फायदा लेखक, प्रकाशक आणि मुद्रण संस्थांना होईल.
– डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

वाचन संस्कृती वाढविण्यासाठी शांतता…पुणेकर वाचत आहे हा महत्त्वाचा उपक्रम असून, यात मीही सहभागी होणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी लागण्याच्या दृष्टीने चांगला उपक्रम आहे. त्यामुळे उपक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हायचे आहे. पुणेकरांनी या उपक्रमात प्रभावीपणे सहभागी होऊन, आपले योगदान द्यायचे आहे.
– प्रदीप रावत, अध्यक्ष, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था

शांतता…पुणेकर वाचत आहे या उपक्रमाबाबत

वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आणि ती वाढवण्यासाठी शांतता…पुणेकर वाचत आहे हा उपक्रम होणार आहे. या उपक्रमात आज गुरुवारी दुपारी १२ ते १ या वेळेत आपल्या आवडीचे पुस्तक वाचायचे आहे. तुम्ही जिथे असाल, तिथे पुस्तक वाचायचे आहे. त्याची माहिती तुम्ही सोशल मीडियावर #mybookstory हा हॅशटॅग वापरून शेअर करता येईल, असे महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.