Osmanabad Crime : बॅरेकच्या दरवाज्यावर अडकवलेले कपडे काढण्यावरून कैद्याची हुज्जत; कर्मचाऱ्यास दिली जीवे मारण्याची धमकी

कर्तव्यात अडथळा करणाऱ्या कैद्यावर गुन्हा दाखल

0

एमपीसी न्यूज – कारागृहातील बॅरेक क्र. 1 च्या दरवाजावर कैद्यांनी अडकवलेल्या कपड्यांमुळे बॅरेक मधील परिसर दिसून येत नव्हता. यामुळे कपडे काढण्यास सांगणाऱ्या कर्मचाऱ्यास कैद्याने जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

याप्रकरणी उस्मानाबाद आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी, उस्मानाबाद जिल्हा कारागृहात कॉन्स्टेबल नारायण बाबुराव माटेकर हे पहाऱ्यावर होते. ते कारागृहातील बॅरेक क्र.1 जवळ आले असता कैद्याने दरवाजावर अडकवले होते. यामुळे बॅरेकमधील परिसर दिसुन येत नसल्याने विपरीत घटना घडू नये व कैद्यांची सुरक्षाव्यवस्था चोख व्हावी या करीता दरवाजाजवळ बसलेला कैदी सलिम इलाही नदाफ, रा. सिंदगाव, ता. तुळजापूर यास अडकवलेले कपडे काढण्यास नारायण माटेकर यांनी सांगितले.

यावर चिडून जावून सलिम नदाफ याने माटेकर यांच्याशी हुज्जत घालून शिवीगाळ करुन, “मी जामिनावर बाहेर आल्यावर तुला जिवे मारतो” असे धमकावून माटेकर यांची गचांडी धरुन ढकलून दिले. अशा प्रकारे सलिम नदाफ याने लोकसेवकाच्या कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. यावरुन कारागृह कर्मचारी नारायण माटेकर यांनी दि.17 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.