Pandharpur : विठ्ठलाची शासकीय महापूजा फडणवीसांच्या हस्ते सपत्निक संपन्न

एमपीसी न्यूज – दरवर्षीप्रमाणे यंदाही पंढरपुरात  कार्तिकी एकादशी मोठ्या ( Pandharpur) उत्साहात साजरी केली जात असून प्रथेप्रमाणे आज पहाटे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा करण्यात आली.तर, यंदाचे मानाचे वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला गावातील बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे यांना पुजेचा मान मिळाला आहे. गेल्या 15 वर्षांपासून ते न चुकता वारी करत आहेत.

अनेक वर्षांच्या प्रथेप्रमाणे कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणीची  शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते  करण्यात येते. त्यामुळे, या पूजेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस एकदिवसीय आधीच म्हणजे बुधवारीच पंढरपूरात दाखल झाले होते.

Dehuroad : इंद्रायणी नदी घाटावर डोके ठेचून एकाचा खून

आज श्री. विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला आणि त्यानंतर मंत्रोपचारामध्ये ( Pandharpur) देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक पूजा करण्यात आली. तर, यावेळी नाशिक जिल्ह्यातील  बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे यांना उपमुख्यमंत्र्यांबरोबर विठ्ठलाची पुजा करण्याचा मान मिळाला आहे.

यावेळी महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती सुखी झाला पाहिजे हेच विठुरायाकडे मागणं आहे, तसेच, सर्वांच्याच मनोकामना पूर्ण करण्याची ताकद त्यानं आम्हाला द्यावी, असं साकडं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विठुराया  चरणी घातलं आहे.

ही  पूजा संपन्न झाल्यानंतर  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस आणि मानाचे वारकरी घुगे दाम्पत्य यांचा सत्कार करण्यात ( Pandharpur) आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.