Maratha Reservation : मराठा आरक्षण न मिळाल्याने पंढरपुरातील कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेला उपमुख्यमंत्र्याना बोलावण्यास विरोध

कार्तिकी एकादशीची महापूजा मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्याची मागणी

एमपीसी न्यूज  – पंढरपुरातील आषाढीची पूजा मुख्यमंत्र्यांच्या (Maratha Reservation) हस्ते आणि कार्तिकीची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचा नियम आहे. मात्र मराठा आरक्षण न मिळाल्याने पंढरपूर येथील सकल मराठा समाजाने यंदा कार्तिकी महापूजेसाठी कोणत्याही उपमुख्यमंत्री, मंत्री अथवा आमदाराला येऊ दिले जाणार नसल्याची घोषणा केली आहे.मंदिर समितीनेही मराठा समाजाच्या प्रक्षोभ शासनाला कळविला असून कोणत्याही उपमुख्यमंत्र्यांनी निमंत्रण देणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता यंदा कार्तिकी एकादशीची महापूजा मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्याची मागणी माळशिरस तालुक्यातील मराठा समाजाने केली आहे.

Pune : पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाची हवेली तालुक्यातील अनधिकृत शाळांवर कारवाई सुरू

कार्तिकी पूजेसाठी उपमुख्यमंत्र्यांनी निमंत्रण दिल्यास यात्रा कालावधीत होणाऱ्या प्रकाराला शासन आणि मंदिर समिती जबाबदार राहील असा इशारा मराठा आंदोलकांनी आज मंदिर समितीला दिला. यापूर्वी मराठा आरक्षण आंदोलनामुळे 2018 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आषाढीच्या पूजेला बंदी करून येऊ दिले नव्हते. तशीच वेळ पुन्हा येईल असा इशारा रामभाऊ गायकवाड यांनी दिला.

पंढरपूर येथील मराठा आंदोलकांनी मराठा समाजाचा रोष कमी करण्यासाठी आरक्षण वेळेवर द्यावेच, शिवाय समाजासाठी प्रामाणिकपणे लढणाऱ्या मनोज जरांगे याना महापूजेसाठी निमंत्रित करावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात (Maratha Reservation) आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.