Vande Bharat Express : पनवेल-नांदेड एक्सप्रेसचे इंजिन बिघडले; वंदे भारत एक्सप्रेस पावणेदोन तास खोळंबली

एमपीसी न्यूज – पनवेल-नांदेड एक्सप्रेसचे इंजिन बंद पडल्याने वंदे भारत एक्सप्रेससह अन्य रेल्वे खोळंबल्या. वंदे भारत एक्सप्रेस तब्बल पावणे दोन तास (Vande Bharat Express) तळेगाव दाभाडे रेल्वे स्थानकावर अडकून पडली. रात्री 08.10 वाजता वंदे भारत एक्सप्रेस मार्गस्थ झाली.

पनवेल नांदेड एक्सप्रेस (17613) सायंकाळी चार वाजता पनवेल रेल्वे स्थानकावरून निघते. ही गाडी सायंकाळी 07.25 वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचते. सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास पनवेल नांदेड एक्सप्रेस घोरावाडी आणि बेगडेवाडी या रेल्वे स्थानकादरम्यान बंद पडली. रेल्वेच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने गाडी बंद पडली होती.

PCMC :  सर्व होर्डिंगचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करणार – आयुक्त सिंह

पनवेल नांदेड एक्सप्रेसच्या मागे मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस जाते. मात्र पनवेल नांदेड एक्सप्रेस रेल्वे बंद पडल्याने वंदे भारत एक्सप्रेसला तळेगाव दाभाडे रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आले. वंदे भारत एक्सप्रेस सायंकाळी 06.35 वाजता तळेगाव दाभाडे रेल्वे स्थानकावर आली. (Vande Bharat Express) ही गाडी तब्बल पावणे दोन तास जागेवर होती. पनवेल नांदेड एक्सप्रेसच्या इंजिन मधील बिघाड दुरुस्त केल्यानंतर तिच्या मागून रात्री 08.10 वाजता वंदे भारत एक्सप्रेस मार्गस्थ करण्यात आली.

सायंकाळी 06.08 वाजता सुटणारी लोणावळा शिवाजीनगर लोकल (01567) पाऊण तास उशिरा धावली. एक्सप्रेस रेल्वेच्या इंजिन मधील बिघाडामुळे पुणे लोणावळा दरम्यानच्या लोकलचेही वेळापत्रक कोलमडले

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.