Pavana Sahakari Bank : अण्णासाहेब मगर सहकार पॅनलच्या प्रचाराचा जोर वाढला ! 

एमपीसी न्यूज – पवना सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 2023 ते 2028 या पंचवार्षिक निवडणुकी साठी अण्णासाहेब मगर सहकार पॅनलने प्रचार जोरात सुरु केला आहे. (Pavana Sahakari Bank) विभागनिहाय बैठकांना सुरुवात केली आहे. सभासदांनी इतके वर्ष योग्य लोकांच्या हाती बँकेचे नेतृत्व दिले. यावेळीही योग्य लोकांच्या हातीच बँकेचे नेतृत्व सभासद देतील असा विश्वास पॅनल प्रमुख ज्ञानेश्वर लांडगे यांनी व्यक्त केला.

कासारवाडी येथे झालेल्या सभेला प्रचार प्रमुख संजोग वाघेरे, माजी नगरसेवक दत्तोबा लांडगे, नगरसेवक कुणाल लांडगे, किरण मोट, प्रकाश जवळकर, यशवंत वाखरे, किसन फुगे, मनोज वाखरे, मुरलीधर फुगे, निलेश फुगे, तुकाराम बाजबुलकर, सुनील लांडगे, रवींद्र लांडगे आदी उपस्थित होते.

Pune : गिरीश बापट यांच्या जाण्याने पुण्याचे वैभव हरपले – उदय सामंत

पॅनल प्रमुख ज्ञानेश्वर लांडगे म्हणाले, गेल्या 50 वर्षांपासून पवना सहकारी बँकेचे नेतृत्व सभासदांनी योग्य लोकांच्या हाती दिले. त्याचप्रमाणे यावेळीही योग्य लोकांच्या हाती बँकेचे नेतृत्व द्याल याची खात्री आहे. अण्णासाहेब मगर सहकार पॅनलमधील उमेदवारांचे कपबशी चिन्ह आहे. उमेदवारांना मतदान करुन मोठ्या मताधिक्याने विजयी करावे.

पवना सहकारी बँकेची स्थापना 50 वर्ष आधी झाली आहे. आज बँकेमधील संपत्ती ही आता 350 कोटी रुपयांचा आकडा पार करुन गेली आहे. उत्कृष्ट नेतृत्वामुळे हे शक्य झाले असल्याचे मत पॅनलच्या सदस्यांनी सांगितले. तसेच ह्या वेळी देखील जास्तीतजास्त मतांनी अण्णासाहेब मगर पॅनेलला विजयी करुन द्या असे प्रचार प्रमुख सांजोग वाघिरे पाटिल ह्यांनी म्हटले.

 

अण्णासाहेब मगर सहकार पॅनलमधील उमेदवार

 

सर्वसाधारण गट-

  1. (17)लांडगे ज्ञानेश्वर पांडुरंग
  2. (03)काळभोर विठ्ठल सोमजी
  3. (06)गराडे शांताराम दगडू
  4. (01)काटे जयनाथ नारायण
  5. (14)फुगे शामराव हिरामण
  6. (18)वाघेरे शिवानी हरिभाऊ
  7. (04)काळभोर शरद दिगंबर
  8. (16)लांडगे जितेंद्र मुरलीधर
  9. (08)गावडे अमित राजेंद्र
  10. (10)चिंचवडे सचिन बाजीराव
  11. (05)काळभोर सचिन ज्ञानेश्वर
  12. (09)गावडे चेतन बाळासाहेब
  13. (07)गव्हाणे सुनील शंकर
  14. (13)नाणेकर विपीन निवृत्ती

महिला राखीव गट-

  1. (03)गावडे जयश्री वसंत
  2. (02)काळभोर ऊर्मिला तुळशीराम

अनुसूचित जाती / जमाती गट-

  1. (02)डोळस दादू  लक्ष्मण

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.