Chinchwad: महापालिकेतर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

Pay Tribue to Chhatrapati Shahu Maharaj in pcmc महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वतीने सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त चिंचवड येथील त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसदस्य केशव घोळवे, माजी नगरसदस्य मारुती भापकर, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता सुनील वाघुंडे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कोल्हापुर जिल्हा मित्र मंडळाचे पांडुरंग पाटील, कुशाग्र कदम, जगदीश परीट, मिलिंद वेल्हाळ, सुनील पाटील, नामदेव शिंत्रे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.