Blood Donation Camp: सीए स्थापना दिनानिमित्त ‘आयसीएआय’तर्फे रविवारी रक्तदान शिबीर

Blood Donation Camp: On Sunday blood donation camp by ICAI on the occasion of CA Foundation Day दि. 28 जून नंतर देखील 1, 3 व 4 जुलै या तीन दिवशी शहराच्या विविध भागात हे रक्तदान शिबीर होणार आहे.

एमपीसी न्यूज- सनदी लेखापाल (सीए) स्थापना दिवसानिमित्त दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) आणि वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाऊंटंटस स्टुडंट्स असोसिएशन (विकासा) यांच्या संयुक्त विद्यमाने रवीवारी (दि.28) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. 28 जून नंतर देखील 1, 3 व 4 जुलै या तीन दिवशी शहराच्या विविध भागात हे रक्तदान शिबीर होणार आहे. येत्या रविवारी (दि.28) फडके संकुल, टिळक रोड व आयसीएआय भवन, बिबवेवाडी येथे 10 ते 5 या वेळेत हे रक्तदान शिबीर होणार आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात रक्ताची कमतरता भासत आहे. राज्यातील रक्ताचा तुडवडा भरून काढण्यासाठी रक्तदान करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

दरवर्षीप्रमाणे सीए स्थापना दिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित केले जोते. शहराच्या विविध भागात होत असलेल्या या शिबिरांमध्ये सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे.

अधिक माहितीकरिता www.puneicai.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन ‘आयसीएआय’ पुणे शाखेचे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.