PCMC: घर बसल्या 6 हजार नागरिकांनी घेतली मालमत्ताकराची ‘एनओसी’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक, मालमत्ताधारकांना  (PCMC) विविध कामांसाठी कर संकलन विभागाचा मालमत्ता कर थकबाकी नसल्याचा दाखला (एनओसी) आवश्‍यक असतो. नागरिकांना हा दाखला घरबसल्या मिळावा, यासाठी महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने ऑनलाइन दाखला देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून एका वर्षात 6 हजार 307 नागरिकांनी ऑनलाइन एनओसी घेतली आहे.

Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात तोडफोड करुन गोंधळ प्रकरणी अभाविपच्या कार्यकर्त्यांंविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये 5 लाख 97 हजार मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांना कर आकारणी व कर संकलन विभागाच्या माध्यमातून सर्वच सेवासुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याच अनुषंगाने कर संकलन विभागाने 1 एप्रिल 2022 पासून नागरिकांसाठी पालिकेच्या संकेतस्थळावरून मोफत ऑनलाइन एनओसी उपलब्ध करून दिली आहे. 31 मार्च अखेर 6 हजार 307 नागरिकांनी ऑनलाइन एनओसी घेतली असल्याची माहिती कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली.

याबाबत सहायक आयुक्त देशमुख म्हणाले, मालमत्ताधारकांना विविध कामांसाठी मालमत्ता कर थकबाकी नसल्याची एनओसी आवश्‍यक असते. महापालिकेच्या संकेतस्थळावर आवश्‍यक माहिती भरल्यानंतर कर आकारणी व कर संकलन विभागाकडील मालमत्ता कर थकबाकी नसल्याचा दाखला नागरिकांना ऑनलाइन मिळतो. वर्षभरात 6 हजार 307 नागरिकांनी मोफत  (PCMC) एनओसी घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.