PCMC : आपला दवाखान्यास जागा मिळेना!

एमपीसी न्यूज – शहरातील नागरिकांना आपल्या (PCMC) घराजवळच आरोग्य व वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी महापालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत शहरातील 35 ठिकाणी ‘नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र’ व ‘हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्याचे नियाेजन आहे. मात्र, दवाखाना उभारण्यासाठी दाेनदा जाहिरात देऊनही महापालिकेला भाडेतत्वावर जागा मिळत नाही. त्यामुळे दवाखाना उभारण्यासाठी काेणी जागा देता का जागा? अशी म्हणण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे.

शहराची वाढती लाेकसंख्या विचारात घेता आराेग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी महापालिकेने पाऊले उचलली आहेत. याच धर्तीवर महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 35 नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रे व आपला दवाखाना उभारण्याचे नियोजन केले आहे. यासाठी भाडेतत्त्वावर जागा घेण्यात येणार आहे. ‘नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र’ व ‘हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ यासाठी जागा देणाऱ्या मालकांसोबत 11 महिन्यांचा भाडेकरार केला जाणार असून आवश्यकतेनुसार मुदतवाढ दिली जाणार आहे.

भाडे तत्त्वावर द्यावयाच्या मालमत्ता किंवा मिळकतींचे सर्व कर, पाणीपट्टी, विद्युत देयके करारनामा करण्याच्या तारखेपर्यंत भरलेली असणे आवश्यक आहे. मात्र, महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने जागा भाड्याने मिळावी, यासाठी दाेन वेळा वर्तमान पत्रात आरोग्य वर्धिनी केंद्र’ व ‘ आपला दवाखाना’ उभारण्यासाठी जाहिरात प्रसिध्द केली. त्यासाठी दाेन्ही वेळा 15-15 दिवसांची मुदत देऊन पालिकेला जागा मिळत नाही.

Chinchwad : कार्यक्रमाच्या बहाण्याने भांडी पळवणारी टोळी सक्रीय

महापालिकेला भाड्याने जागा मिळाल्यानंतर भाडेकरार केल्याच्या तारखेपासून करार संपुष्टात येण्याच्या तारखेपर्यंत येणारी सर्व विद्युत व पाणीपट्टी देयके महापालिकेच्या वैद्यकीय विभाग भरणार आहे. मात्र, मिळकत कर, देखभाल दुरुस्ती खर्च व भाडेकरार करण्यासाठीचा खर्च जागा मालकाने करायचा आहे. बाजारभावाप्रमाणे अथवा महापालिकेने निश्चित केलेल्या दराने दरमहा भाडे दिले जाणार (PCMC) आहे. इमारतीबाबत. भविष्यात वादविवाद किंवा काही अडचण निर्माण झाल्यास भाडेकरार आपोआप संपुष्टात येणार आहे. कायदेशीर बाबी उद्भवल्यास जागा मालक जबाबदार राहतील.

या आहेत अटी-शर्ती

दवाखान्यासाठी जागा उपलब्ध करून देताना जागा मालकाने स्वच्छतागृह व वॉश बेसिनची सोय करून देणे आवश्यक आहे. जागेच्या बांधकामाचे आकारमान किमान 750 ते कमाल एक हजार चौरस फुट व किमान तीन-चार खोल्या असाव्यात, अशा अटी व शर्ती असून त्या मान्य असलेल्या जागा मालकांनी अथवा संस्थांनी आपली मिळकत असलेल्या भागातील क्षेत्रीय कार्यालयांत प्रस्ताव पाठवायचा आहे.

राज्य सरकारच्या आदेशानुसार शहरातील विविध भागात 35 ‘नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र’ व ‘हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ उभारण्यात येणार आहे. दवाखान्यासाठी जागा देणाऱ्या मालकांसोबत 11 महिन्यांचा भाडेकरार केला जाणार असून आवश्यकतेनुसार मुदतवाढ दिली जाणार आहे. – विजयकुमार खाेराटे, (अतिरिक्त आयुक्त)

आठही क्षेत्रीय कार्यालय परिसरात ‘नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र’ व ‘हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ उभारण्यासाठी पालिकेला भाड्याने जागा घ्यायची आहे. मात्र, दाेन वेळा जाहिरात प्रसिध्द करूनही प्रतिसाद मिळत नाही. वास्तविक पालिका बाजारातील जागा भाड्याच्या दरानुसार पैसे संबंधित मिळकत धारकांना देणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आराेग्यासारख्या महत्वाच्या कामाला जागा भाड्याने देण्यासाठी पुढे घ्यावे. – डाॅ. लक्ष्मण गाेफणे (आराेग्य वैद्यकीय अधिकारी)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.