PCMC : शहरातील वायू प्रदूषण घटले!

एमपीसी न्यूज – अवकाळी पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील (PCMC) वायू प्रदूषण मात्र, कमालीचे घटले आहे. हवेची गुणवत्तेत सुधारणा झाल्याने शहरवासियांना माेठा दिलासा मिळाला आहे. दिवाळीत फटाके आणि सुरू असलेल्या बांधकामांसह आदी बाबींमुळे शहरातील काही भागातील हवेची गुणवत्ता अतिवाईट श्रेणीमध्ये गेली होती. अवकाळी पावसामुळे वायू प्रदूषणात माेठ्या प्रमाणात घट झाली आहे.

हिवाळ्यात जमिनीवरील धुलिकण हवेत जाऊन हवा प्रदूषित होते. धुलिकणांचे प्रमाण वाढते. गेल्या काही दिवसात शहरातील प्रदूषणात माेठी वाढ झाली होती. त्यापार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने खबरदारी म्हणून विविध उपाययोजना हाती घेतल्या होत्या. मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या.

दिवाळीत नागरिकांनी जोरदार फटके फोडले. फटाक्यांच्या प्रदूषणाची भर पडल्याने शहरातील वाकड, भोसरी, निगडीतील हवा गुणवता निर्देशांकात धुलिकणांचे प्रमाण 380 च्या पलीकडे गेले. त्यामुळे हवेची गुणवत्ता अतिवाईट श्रेणीमध्ये गेली होती. दिल्लीनंतर पिंपरी-चिंचवड शहराच्या काही भागातील हवा प्रदूषित झाली हाेती.

त्यामुळे शहरात सुरू असलेली बांधकामे सात दिवस बंद करण्याचे आदेशही महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले हाेते. हवेची गुणवत्ता सुधारल्याने 20 नाेव्हेंबरपासून बांधकामे पुन्हा सुरू करण्यात आली हाेती. त्यानंतरही शहरातील भूमकर चाैक, निगडी, भाेसरी या भागातील हवेची गुणवत्ता (एक्यूआय) 100 ते 125 हाेता.

Pune : आयएएसच्या सात सायकलपटूंनी आठ दिवसात पार केले पुणे ते कन्याकुमारी 1600 किमीचे अंतर!

मात्र, रविवारी सायंकाळी जाेरदार अवकाळी पावसाने शहर आणि परिसराला चांगलेच झाेडपले. त्यामुळे शहरातील विविध (PCMC) भागातील एक्यूआय 50 ते 60 च्या दरम्यान हाेता.

दिवाळीत हवा गुणवत्ता निर्देशांकात धुलिकणांचे प्रमाण 380 च्यापुढे गेले होते. त्यानंतर महापालिकेने विविध उपाय याेजना केल्या. त्यामुळे शहरातील हवेत सुधारणा हाेऊन धुलिकणांचे प्रमाण 100 ते 125 च्या आसपास झाले हाेते. मात्र, रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील विविध भागातील धुलिकणांचे प्रमाण 50 ते 60 च्या दरम्यान आले आहे. त्याचबराेबर रस्त्यांची ‘रोड वॉशर’ यंत्रणा असलेल्या दोन वाहनांद्वारे साफसफाई सुरु ठेवली जाणार आहे. त्यामुळे प्रदूषणात आणखी घट हाेणार असल्याचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.