Pimpri News : पिंपरी-चिंचवड महापालिकेत पंडीत जवाहरलाल नेहरुंची जयंती साजरी

एमपीसी न्यूज – भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील नेहरु यांच्या प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पुष्षहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, नगरसदस्या अनुराधा गोरखे,जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

पंडीत जवाहरलाल नेहरु यांची आज 132 वी जयंती आहे. देशभर पंडीत नेहरु यांना अभिवादन केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महापालिका मुख्यालय तसेच नेहरूनगर, पिंपरी येथील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.