Ulhas Jagtap : जनसंवाद सभेच्या माध्यमातून योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवा – उल्हास जगताप

एमपीसी न्यूज – शहरात असणाऱ्या महत्वपूर्ण सोयी सुविधा तसेच शहराच्या दृष्टीने माईलस्टोन ठरणाऱ्या प्रकल्प, उपक्रम आणि योजनांची माहिती प्रत्येक नागरिकाला असावी. यासाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी नागरी सहभाग घेतल्यास माहितीचे वहन सहजतेने करता येईल.(Ulhas Jagtap) त्यादृष्टीने जनसंवाद सभा देखील माहितीच्या आदान प्रदानासाठी प्रभावी माध्यम असून, अधिकाऱ्यांनी नागरिकांपर्यंत विविध माहिती पोहचवण्यासाठी जनसंवाद सभांचा आधार घ्यावा, असे मत अतिरीक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी मांडले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या आशा आणि आकांक्षांचे प्रतिबिंब महापालिकेच्या ध्येय धोरणे, विविध निर्णयात दिसावे तसेच शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी  तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्याच्या हेतूने जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज जनसंवाद सभा पार पडली. ब क्षेत्रीय कार्यालयात अतिरिक्त आयुक्त जगताप यांनी नागरिक आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.

जगताप म्हणाले, शहरात असलेले दुर्गादेवी टेकडी, भक्ती शक्ती उद्यान, बर्ड व्हॅली, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान, तारांगण, सायन्स पार्क, मारुतराव लांडगे आंतराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र, मेजर ध्यानचंद  पॉलीग्रास हॉकी स्टेडीयम, वेंगसरकर क्रिकेट अकादमी, विविध क्रीडा संकुले, जलतरण तलाव, डॉग पार्क, विविध रुग्णालये, दवाखाने, प्राथमिक व माध्यमिक शाळा, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र,(Ulhas Jagtap) कौशल्य विकास केंद्र, विविध सभागृह, नाट्यगृह, विरंगुळा केंद्र, सांस्कृतिक सभागृह, अभ्यासिका, ग्रंथालये, समाज विकास विभागामार्फत विद्यार्थी, महिला, दिव्यांग, विधवा, मागासवर्गीय, अनाथ, तृतीयपंथी, ज्येष्ठ नागरिक अशा विविध घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजना, तसेच इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, प्रशासनातील कामकाजात अद्ययावत संगणक प्रणालीचा वापर, नारिकांच्या समस्या सोडवण्यासाठी असलेल्या सारथी अॅप सह विविध माहितीचे नागरिकांपर्यंत सहजपणे वहन होण्यासाठी अधिकाऱ्यांनी जनसंवाद सभांचा आधार घ्यावा, यामुळे शहरामध्ये असलेल्या पायाभूत सुविधा, सेवा सुविधा यांबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण होण्यास मदत होईल,  असे ते म्हणाले.

Piyush Goyal : नोकरी शोधणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे व्हा – केंद्रीय मंत्री पीयूष गोयल

दरम्यान, आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत 80 नागरिकांनी सहभाग घेऊन तक्रारवजा सूचना मांडल्या.  यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह  क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे 24, 8, 3, 3, 7, 12, 16 आणि 7 इतक्या नागरिकांनी उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले. (Ulhas Jagtap) क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिका-यांनी भूषवले. तसेच आठही क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी, सुचिता पानसरे, सोनम देशमुख, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सीताराम बहुरे, शीतल वाकडे, विजयकुमार थोरात हे उपस्थित होते. क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत स्थापत्य, जलनिस्सारण, पाणीपुरवठा, विद्युत, नगररचना विभागांचे कार्यकारी अभियंता, उद्यान, वैद्यकीय, आरोग्य, करसंकलन  या विभागांचे अधिकारी  उपस्थित होते.

आज झालेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारी व सूचना मांडल्या. रस्त्याच्या दुभाजकांमध्ये लावण्यात आलेल्या शोभेच्या झाडांच्या फांद्यांची छाटणी योग्य प्रकारे करण्यात यावी, (Ulhas Jagtap) विविध ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक संख्येने विरंगुळा केंद्र उभारण्यात यावेत, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात यावी. तसेच रस्त्याच्या कडेला आणि रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणांवर निष्कासनाची कारवाई करण्यात यावी.

शहरात विविध ठिकाणची अतिक्रमणे काढण्यात आली आहेत, अशा ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी, जलवाहिन्यांचे अर्धवट असलेली कामे तातडीने पूर्ण करावित, तसेच फुटलेल्या जलवाहिन्या दुरुस्त कराव्यात,  सुरु असलेली रस्त्यांची कामे जलदगतीने पूर्ण करावित, (Ulhas Jagtap) पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होईल याची दक्षता घ्यावी, खराब झालेल्या जलवाहिन्यांच्या ठिकाणी नव्याने जलवाहिन्या टाकण्यात याव्यात, रस्त्याच्या मध्यभागी आणि पदपथावरील निघालेले पेव्हिंग ब्लॉक तात्काळ बसवावेत, फुटलेल्या मलवाहिन्या लवकर दुरुस्त कराव्यात, नव्याने बस्थानके उभारण्यात यावित, बी आर टी रस्त्यावरून खासगी वाहनांना वाहतूक करण्यास मज्जाव करावा, अशा सूचना व तक्रारी आज झालेल्या जनसंवाद सभेमध्ये नागरिकांनी मांडल्या.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.