Pimpri: आज (शनिवार) एकाच दिवशी 46 रुग्ण; ‘हा’ परिसर केला ‘सील’

PCMC declares contianment zones in Pimpri, Wakad, WadmukhWadi area as COVID-19 patient count increases.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला कोरोनाने विळखा घातला आहे. आज (शनिवारी) एकाच दिवशी शहरातील तब्बल 46 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात वायसीएम रुग्णालयातील एक डॉक्टर, तसेच एक नर्सचाही समावेश आहे. पॉझिटीव्ह रुग्ण आलेल्या पिंपरी, वाकड, वडमुखवाडीतील काही परिसर महापालिका प्रशासनाने सील केला आहे.

शहरातील ज्या भागात कोरोनाचे रुग्ण सापडतील. तो भाग महापालिकेकडून तत्काळ सील केला जातो. त्या परिसरातील हालचालींवर बंधने आणली जातात.

चिंचवड मधील आनंदनगर झोपडपट्टीसह पिंपरी कॉलनी, वाकड पोलीस लाईन, वडमुखवाडी परिसरात आज कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत.

त्यामुळे पिंपरी कॉलनीतील पिंपरी (साई चौक-आयसीआयसीआय बँक एटीएम-डेरा संत बाबा हरिया सिंग दरबार- शाम सुंदर सुपर मार्केट- श्री मुद्रा गणेश मंदिर- गे लॉर्ड चौक- महादेव पॅटीस वाला चौक),

वाकड पोलीस लाईन वाकड (सिसिम स्ट्रीट स्कूल – श्री छत्रपती शिवाजी महाराज रोड- श्री गणेश सुपर मार्केट- आयसीआसीआय बँक एटीएम)

अलंकापुरम सोसायटी वडमुखवाडी ( पीएस रेसिडन्सी- देविका स्टेशनरी- अलंकापुरम रोड-पद्मावती दुध डेअरी) हा परिसर आज रात्री 11 वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येत आहे.

या परिसरात प्रवेशबंदी आणि परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.