PCMC News : महापालिकेचे मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे सेवानिवृत्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. (PCMC News) अग्निशामक विभाग सक्षम करण्यात गावडे यांचे मोठे योगदान आहे.

महानगरपालिकेच्या वतीने ऑक्टोबर 2022 अखेर सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्त होणा-या 29 अधिकारी, कर्मचा-यांचा अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विशेष अधिकारी किरण गायकवाड, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे  जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी मनोज माछरे, उमेश बांदल, नंदकुमार इंदलकर, चारुशीला जोशी उपस्थित होते.

महापालिकेतून सेवानिवृत्त होणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांचे अनेक वर्षांचे कामाचे उत्तम योगदान पाहता त्यांचा सार्थ अभिमान वाटत आहे अशा शब्दात अतिरिक्त आयुक्त जांभळे  यांनी त्यांचे कौतुक करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.

Ekta Daud : ‘राष्ट्रीय एकता दौड’मध्ये धावले पिंपरी-चिंचवडकर  

माहे ऑक्टोबर 2022 मध्ये नियत वयोमानासुसार सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांमध्ये मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे, असिस्टंट मेट्रन सुनंदा चव्हाण, उप अग्निशमन अधिकारी सुर्यकांत मठपती, लेखापाल हनिफ सय्यद, मंगेश शिनगारे, मुख्याध्यापिका शैलजा मोरे,  (PCMC News) सुनंदा अस्वार, गटनिदेशक विजय आगम, लाईव्ह स्टॉक सुपरवायजर ज्ञानेश्वर बांदल, मुख्य लिपिक अरुण अहिवले, आरोग्य निरिक्षक सुनील चौहान, सहाय्यक शिक्षक पुष्पा शिंदे, उपशिक्षक रिजवाना सय्यद, रखवालदार शिवाजी काळे, शिपाई संजय ओव्हाळ, मजूर राजेंद्र आलम, हनुमंत गायकवाड, सफाई कामगार सरोज कायताळे, सफाई सेवक कमलेश वाल्मिकी, गटरकुली संजय सिंगाराम यांचा समावेश आहे.

तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या कर्मचा-यांमध्ये कार्यालय अधिक्षक लक्ष्मण पवार, मुख्य लिपिक नंदा कदम, सविता नंदकर, मिटर निरिक्षक प्रमोद शहाणे, डॉग पिग स्कॉड कुली राजू जगताप, (PCMC News) सफाई सेवक मनोज धारू, सुनिल लांडगे, स्प्रेकुली रुपेश कांबळे, कचरा कुली देवीदास केदारी यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी तर सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक  यांनी केले. आभार विशेष अधिकारी किरण गायकवाड  यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.