PCMC : महापालिका उपअभियंता, लेखापाल यांना पदोन्नती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांतील कार्यकारी (PCMC )अभियंता, उपअभियंता, लेखाधिकारी, प्रमुख अग्निशमन विमोचक, सहायक आरोग्य अधिकारी, चालक तथा यंत्रचालक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यास पदोन्नती समितीने शिफारस केली होती. त्यानुसार आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीस मान्यता दिली आहे.

स्थापत्य विभागाचे उपअभियंता वैशाली ननावरे, राजेंद्र मोराणकर, विजय वाईकर, हरविंदरसिंग बन्सल, सतीश वाघमारे, (PCMC )विजय जाधव, देवेंद्र बोरावके या 7 जणांना कार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.

 

कार्यकारी अभियंता संजय तुपसाखरे हे 31 मार्चला सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्या रिक्त जागेवर बोरावके यांना पदोन्नती दिली आहे. स्थापत्य विभागाचे कनिष्ठ अभियंता अश्लेश चव्हाण, चंद्रकांत गंडाळ, प्रवीण धुमाळ, दिग्विजय पवार, अमर जाधव, प्रशांत कोतकर, शाम गर्जे, स्वप्निल शिर्के, शोएब शेख, मीनल दोडल, सचिन कुतवळ, संजय जाधव, अमित दीक्षित, प्रसाद देशमुख, सुशीलकुमार लवटे, निखिल फेंडर या 16 जणांची उपअभियंता म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे.

 

Chikhali : खेळताना विहिरीत पडून तीन वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

लेखापाल मनोज भोसले, उषा माने, राजू जठार, चारूशिला जोशी यांना लेखाधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. अग्निशमन विभागात प्रमुख अग्निशमन विमोचक (लिडींग फायरमन) म्हणून श्रीकांत वैरागर, किरण निकाळजे, हनुमंत होले, शाहू व्हनमाने, अनिल वाघ, अनिल निकम या सहा जणांना पदोन्नती देण्यात आली आहे. ग्रंथपाल कल्पना जाधव यांना ग्रंथपालप्रमुख म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.

मुख्य आरोग्य निरीक्षक अंकुश झिटे व सुधीर वाघमारे यांना सहायक आरोग्य अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. वाहनचालक सरोश फुंडे, दीपक ढवळे, मयूर कुंभार, अमोल चिपळूणकर, सूरज गवळी, संभाजी दराडे, विशाल फडतरे, जालिंद्रनाथ जाधव, अमोल खंदारे, प्रदीप भिलारे, रूपेश जाधव या 11 जणांना चालक तथा यंत्रचालक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.