Chikhali : खेळताना विहिरीत पडून तीन वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – घरासमोर खेळत असताना जवळच असलेल्या विहिरीमध्ये (Chikhali )पडून तीन वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 1) चिखली परिसरात घडली.वसीम नईमुद्दीन शेख (वय 3) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वसीम हा त्याच्या मित्रांसोबत सोमवारी सायंकाळी (Chikhali )घरासमोर खेळत होता. खेळत असताना तिथे असलेल्या एका विहिरीमध्ये तो पडला.  वसीमच्या घरच्यांना तो पडल्याचे कळताच त्यांनी चिखली  पोलिस ठाण्यात एकच धाव घेतली. चिखली पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली.

 

Pimple Nilakh: दवाखान्याच्या खर्चावरून सावत्र बहिणीला बेदम मारहाण

ज्या विहिरीत वसीम  पडला त्या विहिरीची खोली ३० फूट असून पोलिसांनी पाण्याचा पंप लावून पाणी काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर मंगळवारी  (2 एप्रिल) रोजी सकाळी अग्निशमन दलाच्या पथकांना पाचारण करण्यात आले. विहिरीतील गाळात रुतलेल्या अवस्थेतून वसीमचा मृतदेह मंगळवारी (दि. 2) सायंकाळी साडेचार वाजता बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना व चिखली पोलिसांना यश आले. चिखली पोलिस वसीम कसा पडला याच्याबाबत तत्परतेने पुढील तपास करत आहेत.

वसीमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याच्या अकस्मात जाण्याने त्याच्या मित्रांमध्ये कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.