PCMC News : जलवाहिनी फुटल्याने ‘हा’ भाग आहे बाधित!

एमपीसी न्यूज –  रावेत येथे टप्पा 3 ला पाणीपुरवठा करणा-या 1400 मिलिमिटर व्यासाच्या जलवाहिनीला 26 ऑक्टोबर रोजी अचानक गळती सुरु झाली. (PCMC News) त्यामुळे पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवावी लागली. जलवाहिनी फुटल्याने शहरातील अर्धा भाग बाधित झाला.

जाधववाडी मधील रिव्हर रेसिडेन्सीपरिसर, ऐश्वर्यम हमारा सोसायटी , देहूआळंदी रोड परिसर,मधला पेठा, बोल्हाईमळा,शिवरस्त्यापर्यंत, त्रिवेणीनगर, आकुर्डी, संभाजीनगर, शाहूनगर, यमुनानगर, काळभोर नगर, विद्यानगर, से.22, ओटा स्किम, रुपीनगर, तळवडे, जोतिबानगर व इतर भाग, कुदळवाडी महाराष्ट्र वजन काटा परिसर, जाधववाडी,   कृष्णानगर, फुलेनगर, शिवतेजनगर, पूर्णानगर, , नेवाळेवस्ती, सुदर्शननगर, शरदनगर, कोयनानगर, केशवनगर,चिखली गावठाण,कुदळवाडी, पवारवस्ती, हरगुडेवस्ती अजंठानगर, चिखली परिसर, नेहरूनगर, उद्यमनगर, यशवंतनगर, गवळीमाथा झोपडपट्टी,खराळवाडी, गांधीनगर, कामगारनगर, अजमेरा, मासुळकर कॉलनी, मोरवाडी, वास्तू उद्योग, लालटोपीनगर, महेशनगर, विठ्ठलनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प हा भाग बाधित झाला. या भागात पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती.  आज (शुक्रवारी) सकाळपासून पाणीपुरवठा सुरु केला आहे. परंतु, दुरुस्ती कामासाठी घेतलेल्या शटडाऊनमुळे पाणीपुरवठ्याची परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी मंगळवारची वाट पाहावी लागणार आहे.

PCMC News : सह शहर अभियंत्यांच्या  कामकाजात फेरबदल; रामदास तांबे यांच्या जबाबदारीत वाढ

कार्यकारी अभियंता रामनाथ टकले म्हणाले, रावेत मुकाई चौकाकडे रावेत बीआरटीएस रस्त्यास लागून असलेल्या रिकाम्या भुखंडामध्ये ही जलवाहिनी फुटली होती. जलवाहिनी दुरुस्तीचे काम जवळपास 30 तास चालले होते. (PCMC News) भूमिगत जलवाहिनी खोलवर भागात होती. त्यामुळे दुरुस्तीसाठी वेळ लागला. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले. पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.