PCMC : महापालिका अर्धवेळ 65 तज्ज्ञ डॉक्टर घेणार

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या वतीने नागरी आरोग्य (PCMC)अभियान अंतर्गत महापालिका दवाखान्यांमध्ये (पॉलिक्लिनिक) 65 तज्ज्ञ डॉक्टर अर्धवेळ भरण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

फिजिशियन – 9, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ – 9, बालरोगतज्ज्ञ -9, नेत्र चिकित्सक -9, त्वचारोग तज्ज्ञ -9, मानसोपचार तज्ज्ञ – 10, कान-नाक-घसा तज्ज्ञ -10 आदी पदे अर्धवेळ भरली जात आहेत.

Pune: सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मान्यवर लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन

म्हेत्रेवस्त भोशी, यमुनानगर, सांगवी, संभाजीनगर, चिखली घरकुल,(PCMC) वाल्हेकरवाडी, नेहरुनगर, ग दिघी येथील दवाखान्यांसाठी हे तज्ज्ञ डॉक्टर घेण्यात येणार आहे. बिजलीनगर येथील दवाखान्यासाठी फक्त मानसोपचार तज्ज्ञ घेतले जाणार आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.