Pune: सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मान्यवर लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने नवी दिल्ली येथे सुरू (Pune)असलेल्या 51व्या जागतिक पुस्तक महोत्सवातील पुणे पुस्तक महोत्सवाच्या दालनाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या वर्षी पहिल्यांदाच पुणे पुस्तक महोत्सवाचे स्वतंत्र दालन असल्याची माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी कळविली आहे.

पांडे म्हणाले, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या (Pune)हस्ते उद्या दिनांक 14 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता मराठी मान्यवर लेखकांच्या विविध पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Chikhali : चिखली रोड येथील गणेश मंदिरांमध्ये माघी गणेश जयंती उत्साहात साजरी

दिपाली पारवदकर लिखित आणि योगिनी बर्डे यांनी अनुवाद केलेले आर्यभट्ट हे पुस्तक आणि डॉक्टर श्यामा घोणसे यांनी लिहिलेल्या क्रांतदर्शी महात्मा बसवेश्वर या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी दिल्लीतील महाराष्ट्रीयन नागरिकांचे एकीकरण केले जाणार आहे.

पांडे पुढे म्हणाले, राज्यातील 150 कलाकार उद्या सायंकाळी महाराष्ट्राची लोकधारा आणि शिववंदना सादर करणार आहेत. राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त आपली समृद्ध लोककला, वारसा यांचा समावेश असणारा हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाणार आहे. गणेशवंदना, दिवली नृत्य, गजी नृत्य, कोळी गीत, दहीहंडी,ढेमसा / रेला नृत्य, लावणी, मंगळागौर, महाराष्ट्रगीत मेडली, पंढरीची वारी, गोंधळ, शिवराज्याभिषेक असे या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे. हा कार्यक्रम सुमारे 70 मिनिटांचा असणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.