PMPML : पाबेगाव परिसरातील प्रवाशी नागरिकांना दिलासा; पीएमपीएमएल कडून एका बसमार्गाचा विस्तार

एमपीसी न्यूज – वेल्हे तालुक्यातील पाबेगावच्या (PMPML) नागरिकांना पीएमपीएमएलने सुखद धक्का दिला असून आता बसमार्ग क्र. 296 कात्रज सर्पोद्यान ते विंझर या मार्गाचा विस्तार पाबेफाटा पर्यंत याचा विस्तार कऱण्यात आला आहे. उद्या म्हणजे बुधवारी (दि.14) पासून हा विसातरीत मार्ग सुरु होणार आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पाबेगांव (ता – वेल्हे) परिसरातील प्रवासी नागरिकांच्या मागणीनुसार सध्या संचलनात असलेल्या बस मार्ग क्र. 296 कात्रज सर्पोद्यान ते विंझर या मार्गाचा विस्तार पाबेफाटा पर्यंत बुधवारपासून करण्यात येत आहे. त्यामुळे पाबेगांव (ता-वेल्हे) परिसरातील प्रवाशी नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Pune: सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मान्यवर लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन

बसमार्गांचा तपशील खालीलप्रमाणे – PMPML

बसमार्ग क्र.296 कात्रज सर्पोद्यान ते पाबेफाटा.

मार्गे – कात्रज, खेडशिवापुर, नसरापूर, आंबवणे, विंझर, लाशीरगांव, पाबेफाटा.

बस संख्या – 3

बसचा तपशील पुढील प्रमाणे –

1. कात्रज सर्पोद्यान 6.50, 8:25, 10:25, 11:40, 12:55, 14:55, 16:15, 17:40, 19:40, 21:15.

2. पाबेफाटा 5:55, 7:40, 8:55, 10:30, 12:35, 13:50, 15:10, 17:00, 18:25,19:50,

या बससेवेचा लाभ प्रवाशी नागरीक, विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, महिला वर्ग व ज्येष्ठ नागरीक यांनी घ्यावा असे आवाहन परिवहन महामंडळाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.